गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांचा सरकारला खरमरीत सवाल
रत्नागिरी:-समृद्धी महामार्ग कमी वेळात पूर्ण झाला,मात्र Mumbai Goa Highway मुंबई गोवा हायवे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मागील 12 वर्षात पूर्ण होत नाही हे जागतिक रेकॉर्ड असून 2024 च्या निवडणुका डोळयासमोर ठेऊन निवडणूक आधी हायवेचे उदघाटन करण्यासाठी जाणीवपूर्वक हा रस्ता रखडवाला जात आहे का असा खरमरीत सवाल गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केला आहे.
मागील 10 ते 12 वर्षापासून मुंबई गोवा हायवे चे काम सुरू असल्याचे सांगितले जाते.काम अतिशय संथ गतीने सुरू आहे.इतक्या संथ गतीने हे काम का सुरू आहे असा प्रश्न कोकणातील जनतेला पडला आहे. मागील पाच वर्षात समृद्धी महामार्ग पूर्ण झाला,मात्र मुंबई गोवा हायवे फार भयानक परिस्थितीत आहे.पनवेल ते माणगाव या रस्त्याची भयानक दुरावस्था दरवर्षी होते.
हे ही वाचा: रेल्वे स्टेशन सुशोभित करण्याबरोबरच कोकणात रेल्वे गाड्या वाढवा:उदय गोताड
मुळात हा रस्ता का केला जात नाही हा कोकणी जनतेचा सवाल आहे.Mumbai Goa Highway संथ गतीने काम करून 2024 ला या रस्त्याचे उद्घाटन करून कोकणात आम्ही फार मोठी विकास काम केली असा गाजावाजा सत्ताधाऱ्यांना करायचा आहे का?असा सवाल करत उदय गोताड यांनी सरकारच्या धोरणावर आणि संथगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर जोरदार टीका केली आहे.