गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांची मागणी
देवरुख: – Sangmeshwer-Devrukh-Sakharapa Road: संगमेश्वर-देवरुख-साखरपा रस्त्याचा वरचा खराब झालेला संपूर्ण लेअर 5 वर्षांच्या गॅरंटी अंतर्गत,संबंधित ठेकेदाराकडून नव्याने टाकून घ्यावा. अशी मागणी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
रस्त्याला 5 वर्षांची हमी असताना हा रस्ता त्याआधीच खराब झाला असून, या रस्त्याचे कामच निकृष्ट झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असल्याचे भोपळकर यांनी म्हटले आहे.
अनेक वर्षांच्या मागणी नंतर Sangmeshwer-Devrukh-Sakharapa Road संगमेश्वर देवरुख साखरपा या रस्त्याचे रुंदीकरण झाले.खरे मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट झाल्याचे आता स्पष्ट होत आहे,असे भोपळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
संगमेश्वर देवरुख साखरपा या रस्त्याला पाच वर्षाची गॅरंटी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली असताना, त्यापूर्वीच या रस्त्याचा संपूर्ण वरचा लेयर हा खराब झालेला आहे.Sangmeshwer-Devrukh-Sakharapa Road
परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्याचे काम करणाऱ्या, ठेकेदाराकडून संगमेश्वर-देवरुख-साखरपा या रस्त्याला संपूर्ण नवीन थर टाकून घ्यावा.वरवर खड्डे भरण्याचे काम करू नये.साखरपा ते संगमेश्वर पूर्ण नवा थर या रस्त्याला टाकावा. नागरिकांची फसवणूक होणार नाही याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी अशी मागणी भोपळकर यांनी गाव विकास समितीच्या माध्यमातून केली आहे. हा रस्ता ज्या कंपनीने बनवला त्यांच्याकडून संपूर्ण रस्त्याचे काम करून घेण्यात यावे. रस्त्यावर दिशादर्शक फलक,रस्त्याच्या कामाची एकूण रक्कम याचे बोर्ड अद्याप लागलेले नाहीत. त्याबाबत ही संबंधितांना सूचना देण्यात याव्यात असेही श्यामकर्ण भोपळकर यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा: २०२४ च्या निवडणुकीसाठी मुंबई-गोवा हायवेचे काम रखडवले जात आहे का-उदय गोताड