चिपळूण:-दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर एका नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना सावर्डे पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली होती. न्यायालयाने त्याला सुनावलेली 4 दिवसांची कोठडी मंगळवारी संपताच त्याला पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
पीडित मुलीच्या मोबाईलवर हा नराधम संपर्क करत असे. हा फोन ती टाळत असतानाही तो सतत फोन करत असे. हा नराधम मुंबईतून सावर्डे परिसरात दाखल झाला. तसेच बोलायचे असल्याचे सांगून पीडित मुलीला त्याने तिच्या घराबाहेर बोलावले व जबरदस्तीने गाडीवर बसवून तिला त्याच्या मित्राच्या घरी आणले. तिथे त्याने त्या पीडित मुलीवर अतिप्रसंग केला होता. या प्रकरणी त्या नराधमाला सावर्डे पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी ही कोठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता आणखी 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या एका तरुणालाही पोलिसांनी अटक केली असून त्यालाही 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.