रत्नागिरी:-तालुक्यातील कोतवडे येथे नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाल़ा. ही घटना रविवारी दुपारी 1 च्या सुमारास घडल़ी. योगेश शंकर धुमक (42, ऱा सड्ये-पिरंदवणे, रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धुमक हे 17 डिसेंबर 2023 रोजी कोतवडे येथे नारळाच्या माडावर नारळ काढण्यासाठी चढले होत़े. दुपारी 1 च्या सुमारास नारळाच्या झावळीला पकडून नारळ काढत असताना झावळ तुटल्याने ते खाली कोसळल़े. यावेळी जखमी झालेल्या योगेश यांना तातडीने रत्नागिरी येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल़े. योगेश यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आल़े. यावेळी योगेश यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल़े. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े.