संगलट,खेड/इक्बाल जमादार:-मिनी महाबळेश्वरच्या पाऱ्यात घसरण होवून दापोलीचे किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे. त्यामुळे दापोलीकरांना चांगलीच हुडहुडी भरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हिवाळा सुरू झाल्यानंतर त्या प्रमाणात थंडीचा पत्ता नव्हता. त्यामुळे आंबा, काजू बागायतदार चिंतेत पडले होते.
त्याचबरोबर मध्येच पावसाचा शिडकावही झाला. वेळीच थडीचे आगमन न झाल्याने आंबा मोहोरही लांबला. दापोलीच्या कमाल व किमान तापमानात वाढ होत होती. दापोलीचे किमान तापमान १६.७ व १५.५ अंश सेल्सिअसच्या आसपास वर-खाली होत होते. त्यामुळे अपेक्षित थंडी जाणवत नव्हती. मात्र आता तापमानात बदल होवून कमाल तापनाम ३१.५ तर किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअसवर आले आहे. त्यामुळे दापोलीकर व बागायतदारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दापोलीचा पारा १२.८ अंश सेल्सिअसवर,दापोलीकरांना भरली चांगलीच हुडहुडी
