संगलट,खेड/इक्बाल जमादार:-खेड शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी रोटरी इंग्लिश स्कूल खेड आयोजित नाटक स्पर्धेत भाग घेताना त्यांच्या ‘चीड’ या ऱ्हदयस्पर्शी नाटक सादर करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. प्रशालेतील स.शिक्षक विजय मोहिते सर लिखित नाटकातील उत्कृष्ट सहायक कलाकार पुरस्कार हलीमा चौगले तर उत्कृष्ट नेपथ्य म्हणून विजय मोहिते, दिपक सनगरे व राकेश पवार यांची निवड करण्यात आली. नाटकात सहभागी सर्व विद्यार्थिनी तसेच शिक्षिका नाझीमा महाते, जेबा खतीब, सुमीत होमकलस आणि रुबिना कडवईकर यांनी खूपच कष्ट घेतले होते. या सर्वांचे मा.संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्थासदस्य, मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.