चिपळूण:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) जिल्हा कार्याध्यक्षपदी अक्षय केदारी यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांच्यासह अन्य ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुराद आडेरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, महिला जिल्हाध्यक्ष दीपिका कोतवडेकर, इंदुराव पवार, माजी नगरसेवक राजेश कदम, माजी नगरसेवक अविनाश केळसकर, युवक जिल्हाध्यक्ष सहील आरेकर, युवक शहराध्यक्ष श्रीनाथ खेडेकर, रमेश खळे, दिनेश शिंदे, राईस अल्वी, प्रणव सुर्वे, प्रणिता घाडगे आदी उपस्थित होते.
अक्षय केदारी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये गेली ८ वर्षे कार्यरत आहेत. चार वर्षे त्यांनी सोशल मीडियाचे अध्यक्ष म्हणून उत्तम काम केले. तीन वर्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे चिपळूण शहराचे सचिव म्हणूनही यूर्वी त्यांनी काम केले आहे. चिपळूण शहरामध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यांचे मर्जीतले म्हणून श्री. केदारी यांची ओळख आहे.” त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व समाजामध्येही सलोख्याचे सबंध आहेत. पुण्याहून बी. ई. सिव्हिल इंजिनिअरिंग त्यांनी पूर्ण केले असून त्यांची युवकच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षांच्या रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्षपदी अक्षय केदारी यांची निवड
