समीर शिगवण / वांद्री:-संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील जय हनुमान मंडळ मधील साहिल फेपडे या बाल कलाकाराने साकारलेल्या किल्ल्याला तालुकास्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
गडकिल्ले महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्षीदार, गडकिल्ल्यांच्या इतिहासाला नवी झळाळी देण्यासाठी संगमेश्वर तालुक्यात दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे गड किल्ले बांधणी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत मानसकोंड येथील जय हनुमान मंडळ मधील साहिल फेपडे व बाल कलाकारांनी सहभाग घेतला होता. यामध्ये साहिल फेपडे याने रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती. या प्रतिकृतीला तालुकास्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्पर्धेत मिळालेल्या या यशाबद्दल बाल कलाकारांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
मानसकोंड येथील साहिल फेपडे याला तालुकास्तरीय गडकिल्ले बांधणी स्पर्धेत उत्तेजनार्थ
