रत्नागिरी:-शहरातील एका लॉजवर राहणाऱया व्यक्तीचे सामान चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना 15 ऑक्टोबर 2023 रोजी घडली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी शुभम सुनील पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार प्रशांत प्रभाकर महाडिक (35, रा मिरजोळे, रत्नागिरी) हे शहरातील माऊली लॉज टिळक आळी येथे रहायला होते. त्यांनी 15 ऑक्टोबर 2023 सकाळी 9.30 वाजता ते सायं 11 वाजता या कालावधीत माऊली लॉजवर ठेवलेल्या एसी डॉटमॅट्रिक रुममध्ये ठेवलेले सामान अज्ञात इसमाने तक्रारदारांच्या संमतीशिवाय व लबाडीच्या इराद्याने स्वत:च्या फायद्यासाठी चोरून नेले. या घटनेत एकूण 12 हजार 700 रुपयांचे साहित्य चोरीला गेले. ज्यात 12 हजार रुपये किंमतीचा राखाडी रंगाचा उद्वाहनाचा (लिफ्ट) रिमोर्ट आणि 300 रुपये किंमतीचे काळ्dया रंगाचे ब्लुटुथ 300 रुपये किंमतीचे वनप्लस कंपनीचा पांढऱया रंगाचा मोबाईल चार्जर व 100 रुपये किंमतीचा वनप्लस कंपनीचा पांढऱया रंगाचा हेडफोन अशा साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपी शुभम सुनील पवारविरोधात कलम 380 अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लॉजवर राहणा-या व्यक्तीचे सामान गेले चोरीला ;गुन्हा दाखल
