रत्नागिरी :- शहरातील उद्यमनगर येथे अत्यंत मोठी धक्कादायक घटना घडली आहे. ह्या घटनेत एकावर चाकूचा वर देखील करण्यात आला आहे. ही घटना 14 डिसेंबर 2023 रोजी घडली.
पोलिसांकडून प्राप्त सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार यशवंत शांताराम सावंत (51, रा उद्यमनगर रत्नागिरी) हे दि 14 डिसेंबर 2023 रोजी रात्री 8.30 वाजता आपल्या घरी असताना शेजारी राहणारा ओमकार शिंदे यांचा भावोजी प्रशांत ठावरे यांनी तक्रारदार यशवंत सावंत यांना हाक मारून घराच्या बाहेर बोलावले. यावेळी तक्रारदार घराच्या बाहेर येत होते. यावेळी प्रशांत ठावरे , शंकर तारवे उर्प अपी, सौरभ तारवे व त्यांच्या सोबत विजय चव्हाण असे उभे होते. व त्यांनी यावेळी तक्रारदार यांना पाहून माझा मेहुणा ओमकार शिंदे तुमच्याकडे कामाला येणार नाही म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी विजय चव्हाण याने त्याचे जवळ असलेला चाकू तक्रारदार यांच्यावर उगारला. तात्काळ तक्रारदार बाजूला झाले मात्र तो चाकू त्यांच्या आत्येभाऊ मंगेश रामचंद्र जाधव यांच्या डाव्या खांद्याला लागला व दुखापत झाली. त्यावेळि प्रशांत ठावरे, शंकर तारवे उर्प अपी, सौरभ तारवे यांनी तक्रारदारांना हाताच्या थोपटाने मारले शिवाय हातात असलेली कोयतीचा दाखवून ठार मारण्याची धमकी दिली व शिवीगाळ केली. या प्रकरणी प्रशांत ठावरे, शंकर तारवे, सौरभ तारवे, विजय चव्हाण रा उद्यमनगर रत्नागिरी) यांच्याविरोधात कलम 324, 323, 504, 506 34 अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.