मुंबई:-मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (Mumbai Goa Highway) काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खरं तर कोकणच्या विकासाठी अतिशय महत्वाचा असलेला हा महामार्ग अद्यापही रखडल्यामुळे प्रवास करताना नागरिकांची हेळसांड होत आहे.
खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून मुंबई गोवा महामार्ग हा मृत्यूचा सापळा तर ठरत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय. याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत या महामार्गावर तब्बल 2010 जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील पाच वर्ष्याच्या कालावधीत 700 km पेक्षा अधिकचा समृद्धी महामार्ग तयार होऊन जनतेच्या सेवेत रुजू देखील झाला मात्र मुंबई ते गोवा महामार्गचे (Mumbai Goa Highway) पांग आणखीन देखील फिटेनात अशी दशा झाली आहे. मागील तब्बल 12 वर्ष्यापेक्षा अधिक काळापासून हा महामार्गाचे काम चालू आहे. आजतगायत फक्त 67 % इतकेच ह्या महामार्गचे काम पुर्ण झाले असून यानंतर देखीलआणखी कितीसा वेळ हा महामार्ग पुर्ण होण्यासाठी लागणार आहे याबाबत कुठलाही अधिकारी किंवा मंत्री सांगू शकत नाहीत. त्यामुळे ह्या रस्त्याचा वनवास कधी संपणार असे मत कोकणवासियांचे झाले आहे.
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेक्षणात मुंबई ते गोवा महामार्गांवरील चर्चेत मागील 12 वर्षात खराब रस्त्यामुळे 2010 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाने सभागृहात दिली. त्यामुळे या महामार्गबाबतीत बिलकुल गंभीर नाही हेच यातून अधोरेखित होताना दिसून येते आहे. त्याचबरोबर 5000 हजार पेक्षा अधिक लोक मुंबई – गोवा महामार्गांवर जखमी झाल्याचे देखील सरकारने कबूल केले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी ठेकेदारांना वेसण घालण्यात त्यांना अजून यश आलेले नाही. मुख्य म्हणजे कामाच्या दर्जाबाबत त्यांना खडसावून प्रसंगी अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची तयारी चव्हाण यांनी दाखवली पाहिजे, अशी मागणी मुंबई गोवा महामार्ग आक्रोश समितीने केली आहे.
खरं तर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) कामाची सुरुवात 2011 ला झाली तेव्हापासून ते अजातगायत ह्या राष्ट्रीय महामार्गचे काम पुर्ण होताना दिसत नाही. मुंबई पासून सुरु होणारा हा महामार्ग गोवा पर्यंत एकूण 471 km चा आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागाच्या विकासासाठी ह्या महामार्गाचे महत्व अनन्यतुल्य आहे तरी देखील ह्या महामार्गचे काम आजपर्यंत पुर्ण झालेले नाही. याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीदरम्यान विचारना केली असता ” यासाठी सर्वस्वी मीच जबाबदारी असल्याचे मी समजतो असे त्यांनी सांगितले होते.