सायबर पोलीस ठाणे पथकाची कामगिरी
रत्नागिरी:- खुनाच्या गुन्ह्यात कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर कारागृहातून बाहेर पडून फरार झालेल्या रत्नागिरीतील उत्कर्ष नगर येथील मुईन मोहम्मद युसुफ काझी याच्यापर्यंत पोहोचण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक पद्धतीने या आरोपीचा शोध पोलिसांनी घेतला.
ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यात मुईन मोहम्मद युसुफ काझी ( ३३ वर्षे, रा. उत्कर्ष नगर, कुवारबाव रत्नागिरी) हा कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. जुलै २०२३ मध्ये तो संचित रजेवर कारागृहातून बाहेर पडला होता. मात्र हा आरोपी हा ऑगस्ट २०२३ रोजी कारागृहात हजर होणे आवश्यक असताना फरारी होऊन पोलीसांच्या नजरेआड झाला.
या गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक, रत्नागिरी धनंजय कुलकर्णी यांनी सायबर पोलीस ठाण्याला आरोपीचा तांत्रिक दृष्टया शोध घेण्याबाबत पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार सायबर पोलीस ठाणे यांना निर्देशित केले. याप्रमाणे आरोपीचा तांत्रिक शोध घेतला असता आरोपी हा मुंबई, पुणे व सांगली परिसरात असल्याचे आढळले. पोलीस निरीक्षक श्रीमती. स्मिता सुतार यांनी पोलीस अधीक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लागलीच एक पथक मुंबई, पुणे व सांगली येथे रवाना केले व सदर पथकामार्फत आज दिनांक १४/१२/२०२३ रोजी फरार आरोपी मुईन मोहम्मद युसुफ काझी याला पेठनाका, सांगली येथून पुण्याच्या दिशेने पळून जात असताना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कामगिरी खालील नमूद पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे.
1) पोहवा/१५७ रामचंद्र वडार, सायबर पोलीस ठाणे
2) पोहवा/१०४० संदीप नाईक, सायबर पोलीस ठाणे
3) पोहवा/१२६५ अमोल गमरे, सायबर पोलीस ठाणे
4) मपोहवा/६४२ श्रीया साळवी, सायबर पोलीस ठाणे
5) पोहवा/४४४ रमिज शेख, तां.वि.शा, रत्नागिरी
6) पोशि/३२७ निलेश शेलार, तां.वि.शा, रत्नागिरी व
7) पोशि/७३९ सौरभ कदम, सायबर पोलीस ठाणे.