गुहागर:- तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन आबलोली विद्यालयात नुकतेच संपन्न झाले .
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले . प्राथमिक गटात समृद्धी सुरेश आंबेकर हिची स्मार्ट डस्टबीन व माध्यमिक गटात साई एकनाथ सस्ते याची वायरलेस इलेक्ट्रिक ट्रान्सफर सिस्टीम तसेच दिव्यांग विभागामधील शुभम सुभाष गावडे याच्या केळीचा कोंब ( घड ) काढण्याचे साधन या प्रतिकृतीने तालुक्यात प्रथम क्रमांक संपादन केला. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर प्रायोगिक साधने , माध्यमिक गटातील विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धा व भरड धान्य पाककला शिक्षक विभाग यामध्येही पाटपन्हाळे विद्यालयाने सुयश संपादन केले .
गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आबलोली विद्यालयात नुकतेच संपन्न झाले . सदरच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक गट व माध्यमिक गट विद्यार्थी प्रतिकृती , अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक व माध्यमिक गट , प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर निर्मित प्रायोगिक साधने या विभागांमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिकृती ( मॉडेल्स ) सादर केल्या होत्या. इयत्ता सहावी ते आठवी या प्राथमिक गटात कु.समृद्धी सुरेश आंबेकर हिने ‘ स्मार्ट डस्टबिन ‘ ही प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक संपादन केला आहे. इयत्ता नववी ते बारावी या माध्यमिक गटात साई एकनाथ सस्ते याने ‘ वायरलेस इलेक्ट्रिक ट्रान्सफर सिस्टीम ‘ ही प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. दिव्यांग विभागामध्ये इयत्ता दहावीमधील शुभम सुभाष गावडे याने ‘ केळीचा कोंब ( घड ) काढण्याचे साधन ही प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक पटकावला. प्रयोगशाळा सहाय्यक परिचर निर्मिती प्रायोगिक साधने या विभागामध्ये संतोष पांचाळ यांनी ‘ पाण्याचे नमुने तपासणे ‘ ही प्रतिकृती सादर करून तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये इ.नववीमधील श्रेयशा सहदेव नरळे व श्रेया अजय पावसकर यांनी तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच भरडधान्य पाककला शिक्षक विभागात सौ. नमिता प्रसन्ना वैद्य यांनी नाचणी , वरी , राजगिरा व ज्वारी ही धान्ये वापरून ‘ थाळीपीठाच्या स्वादिष्ट चवीने प्रथम क्रमांक संपादन केला. सुयशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक के.डी.शिवणकर , श्री.मयेकर , श्री.बेलवलकर , श्री. इंदुलकर , श्री.निंभोरे , श्रीम.सृष्टी चव्हाण , श्रीम.अनुजा चव्हाण या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान प्रतिकृती (मॉडेल्स )साठी कु.शुभम पडवळकर या विद्यार्थ्याचे विशेष सहकार्य लाभले. प्रथम व द्वितीय क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रतिकृती सादर करून सुयश संपादन करण्याची संधी लाभणार आहे.गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सुयशस्वी विद्यार्थी , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचे पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भालचंद्र चव्हाण , उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ , सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी , मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या .