दापोली प्रतिनिधी:-अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या आरोपीच्या सासू व आईला खेड येथील न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. ही घटना 2022मध्ये दापोली तालुक्यातील कुडावळे येथे घडली होती.
या बाबत पीडित मुलीने दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी सुभाष निकम याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी विवाह केला. तसेच जबरदस्तीने मातृत्व लादले व तिने मुलाला जन्म दिला. या बाबत भा.दं.वि कलम 376 (2) (ह), 376 (3), 202, 34, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 21, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006ााs कलम 9, 10, 11 नुसार संशयित सुभाष निकम यांच्यविरूद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली. याबरोबर सासू तारामती हरिश्चंद्र निकम व आई माधुरी महादेव वाघमारे यांच्याविरूध्दही दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपी तारामती निकम व माधुरी वाघमारे यांयावतीने खेड येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. या आरोपीयावतीने ऍड. स्वरूप सुबोध थरवळ यांनी जामीन अर्जावर युक्तीवाद केला व उच्च न्यायालयो ऍड. थरवळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून या दोघांना काही अटी व शर्तींवर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.