सैतवडे:-SOSA क्रिकेट अकॅडमी रत्नागिरी SCG कप 2023 24 रत्नागिरी. इंटर स्कूल लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा सावंत क्रिकेट मैदान कोळंबे येथे दिनांक पाच ते दहा डिसेंबर पर्यंत घेण्यात येत आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील आठ हायस्कूल ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता ग्रुप ए व ग्रुप बी असे दोन गट पाडून प्रत्येकी 15 षटकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या अतिशय सुंदर नेटनेटके नियोजन येथे संयोजकांमार्फत करण्यात आले होते. या स्पर्धेत फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे, सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूल ,शिर्के हायस्कूल,जी.जी.पी. एस.,माध्यमिक विद्यामंदिर करबुडे,माध्यमिक विद्यालय फणसोप या शाळांनी सहभाग घेतला होता.मा. केतन सावंत यांनी प्रत्यक्ष मैदानात थांबून खेळाडूंची उत्तम व्यवस्था केली होती. भविष्यात या मैदानावर तयार होणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही खेळू शकतात याची ही शालेय स्पर्धा म्हणजे नांदी होती.
मॉडेल इंग्लिश स्कूल या संघाने आपल्या लीगच्या तीन मॅचेस खेळताना सेक्रेट हार्ड कॉन्व्हेन्ट स्कुलवर विजय मिळऊन तीनपैकी एका सामन्यात विजय मिळवला.तर दोन सामन्यात निसटता पराभव पत्करावा लागला.विजयी मॅचचा man of the match अवॉर्ड आयान लोकरे याला प्रदान करण्यात आला. आयानची उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी पाहून आयानला man of the series अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले.
फायनल मॅच नंतरच ते समजू शकेल.या संघात आर्यन मोरे,अरमान पवार ,आयुष पावसकर ,संजीत वासावे ,आयुष झर्वे,आयन लोकरे ,सार्थक डोर्लेकर ,सार्थक जाधव, ओम झर्वे ,मिहीर धातकर, राज भुवड ,विघ्नेश चौगुले, आयुष जाधव, शुभम जाधव, श्रवण जाधव ,आर्यन पवार, क्रीडाशिक्षिका ऋतुजा जाधव यांचे या ग्रामीण भागातील मुलांचा उत्तम खेळ पाहून स्पर्धा आयोजक मा.केतन सावंत व उपस्थितांनी कौतुक केले. तर प्रशालेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर संस्थाध्यक्ष रहिम माद्रे साहेब तसेच संस्थेचे संचालक या सर्वांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका ऋतुजा जाधव यांचे अभिनंदन केले.
दि मॉडेल इंग्लीश स्कुल सैतवडेचा आयान लोकरे Man Of The Series अवॉर्डने सन्मानित
