रत्नागिरी:-सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील कलावंतानी कोकणामध्ये चित्रपट संस्कृती रुजावी त्यासाठी आवश्यक असणारी प्रोत्साहन देणारी मंडळी आपण तयार करणे गरजेचे आहे या उद्देशाने जेष्ठ मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकार श्री.विजय पाटकर यांनी सिंधूरत्न कलावंत मंच स्थापन केला आहे. श्री विजय राणे यांच्या संकल्पनेनुसार चित्रपट संदर्भातील कुशल तंत्रज्ञ आणि कलाकार निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.असे आवाहन केले आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय ( स्वायत्त ) रत्नागिरी आणि सिंधूरत्न कलावंत मंच या दोघांमध्ये समन्वय साधून डॉ. आनंद आंबेकर याने कोकणातल्या कलाकारांसाठी व्यासपीठ तयार करणाऱ्या अनेक संस्थांशी समन्वय साधण्याची जबाबदारी घेतली आहे. भारत शिक्षण मंडळाचे डीजीके महाविद्यालय रत्नागिरी येथे सुद्धा चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार आहे. 11 ते 15 या काळात विविध चित्रपट दाखवले जाणार आहेत त्याचबरोबर चित्रपट आणि रोजगार निर्मिती यावर सातत्याने अनेक कलाकार महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी संवाद करण्याचे मोठे काम होणार आहे. 16 तारखेला मालवण येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे त्यावेळी असंख्य मराठी कलाकार आपली कला सादर करणार आहेत त्याचबरोबर चित्रपट स्पर्धेचे निकाल जाहीर होणार आहेत .श्री विजय पाटकर यांनी अनेक कोकणातील कलाकारांना एकत्र येऊन विकासात्मक काम करण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन ,कार्यवाह सतीश शेवडे यांनी चित्रपट महोत्सवाच्या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतला आणि भविष्यात विद्यार्थ्यांसाठी चित्रपट तंत्रज्ञ निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या आश्वासन दिले आहे. डॉ. प्रफुल्ल दत्त कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे सांगितले की नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये विद्यार्थी केंद्री अभ्यासक्रम बनवण्यासाठी महाविद्यालय स्वायत्त झाल्याने आम्हाला सहज शक्य आहे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक कलेची आवड आहे यामुळे हे आम्हाला शक्य आहे असे आवर्जून सांगितले गेले.
डॉ. आनंद आंबेकर गेली 25 वर्ष महाविद्यालय ..रत्नागिरी जिल्हा आणि मुंबई विद्यापीठ तसेच अनेक कला संस्थांमध्ये सक्रिय असताना सिंधूरत्न कलावंत मंच सोबत संलग्न होऊन विद्यार्थ्यांमध्ये कलागुणांसाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी मानसिकता बदलण्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे श्री विजय पाटकर आणि श्री विजय राणे यांना आश्वासन दिले.
श्री विजय जाधव यांनी स्वतः श्यामची शाळा हा चित्रपट संपूर्ण रत्नागिरी मध्ये शूटिंग केल्याचे सांगून रत्नागिरीतील निष्णात कलाकारांना स्वतः अनुभवल्याचे सांगितले तसेच श्री नांदिवडेकर व्यवसायाने उद्योजक असलेले त्यांनी सिंधुरत्न कलावंत मंच संस्थेला पंचवीस हजाराची देणगी जाहीर केली अनेक चित्रपटातील कलाकार सक्रिय होण्याचे सर्वच विद्यार्थी आणि नागरिकांनी आशा व्यक्त केली.