रत्नागिरी:-तालुक्यातील चवे येथील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत चवे निवईवाडी येथे सर्व ग्रामस्थांसाठी आधारकार्ड अपडेशन कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
शिवसेना युवासेना विभाग प्रमुख (करबुडे विभाग ) श्री. निलेश चंद्रकांत अवेरे यांनी राज्याचे उद्योगमंत्री मा. श्री. उदयजी सामंत, पितृतुल्य अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपविभाग प्रमुख (देऊड गण) व चवे गावचे सरपंच श्री. दिपक विठ्ठल गावणकर यांचे सहकार्याने चवे निवईवाडी येथे सर्व ग्रामस्थांसाठी आधारकार्ड अपडेशन कॅम्प १० डिसें २०२३ रोजी घेतला. त्याला ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला. एकूणच प्रतिसाद पाहता १७ डिसें २०२३ रोजी पुन्हा सदर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कार्यकर्ता कसा असावा, याचे श्री. निलेश अवेरे हे आदर्शवत उदाहरण आहे. समाजासाठी उपयुक्त काम तळमळीने करण्याची निलेश अवेरे यांची प्रवृत्ती ही प्रशंसनीय आहे, अशा शब्दांत सरपंच दिपक गावणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमासाठी गावातून तसेच सर्व स्तरांतून निलेश अवेरे यांचे कौतुक होत आहे.
यावेळी ग्रा. प. सदस्य . श्रीनिवास जोशी, ग्रा. प. सदस्य मनाशी गावणकर, महिला अध्यक्ष . अनिता अवेरे, युवासेना शाखा प्रमुख प्रमोद गावणकर, युवासेना उपशाखा अक्षय गावणकर, प्रमुख वाडी प्रमुख – प्रकाश गावणकर आदी उपस्थित होते.
चवे येथील युवासेनेची समाजिक बांधीलकी
