रत्नागिरी:-शहरातील शिवखोल येथे किरकोळ वादातून तरूणाला मारहाण करण्यात आल़ी. ही घटना शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडल़ी. याप्रकरणी दोघा संशयितांविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा अशी माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आल़ी. मरजान सिराज भाटकर (ऱा शिवखोल रत्नागिरी) व अन्य एक इसम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व आरोपी यांच्यात 9 डिसेंबर 2023 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास वाद झाल़ा. या वादातून संशयित आरोपी मरजान व त्यासोबत असलेल्या इसमाने तक्रारदार यांना मारहाण केल़ी असा आरोप ठेवण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी यांच्याविरूद्ध भादंवि कलम 324, 323, 504, 506, 427 सह 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा.