रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगुळे येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या अंतर्गत कृषी विभागामार्फत पीएम प्रणाम-रासायनिक खताला पर्यायी खतांचा वापर व व्यवस्थापन, माती परिक्षण आणि सेंद्रिय शेती याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
योजनांची माहिती देणारी व्हॅन असणार इथे
विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत लांजा तालुक्यातील कोंड्ये, कुरंग, रत्नागिरीमधील कुरतडे, पोमेंडी बु., संगमेश्वरमधील किरदुवे, कोंडकादामराव, गुहागरमधील कुडाली, चिपळूणमधील नारदखेरकी, देवखेरकी, खेडमधील भडगाव, चाकाळे, मंडणगडमधील देव्हारे, सावरी या गावात उद्या बुधवार दि.13 डिसेंबर 2023 रोजी विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन फिरणार आहे. तरी लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
गणेशगुळे येथे विकसित भारत संकल्प यात्रा माहिमेंतर्गत पर्यायी खतांचा वापर,माती परिक्षण आणि सेंद्रीय शेतीचे मार्गदर्शन
