रत्नागिरी प्रतिनिधी:-नोकरीचे आमिष दाखवून रत्नागिरीतील तरूणाला 37 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 च्या मुदतीत घडल़ी. याप्रकरणी संशयित आरोपी ऋग्वेद संजय अहमदाबादी (ऱा पुणे ) याच्याविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी याने तक्रारदार यांना नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले होत़े. नोकरीसाठी 32 हजार 700 रूपये व मडिकलसाठी 4 हजार रूपयांची मागणी केल़ी. आपल्याला नोकरी मिळणार या आशेपोटी तक्रारदार याने 37 हजार रूपये आरोपीत याला गुगलपे केल़े मात्र अनेक महिने उलटून देखील नोकरी न मिळाल्याने तक्रारदार यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल़े. त्यानुसार त्यांनी रत्नागिरी शहर पोलिंसात तक्रार दाखल केल़ी.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी ऋग्वेद अहमदाबादी याच्याविरूद्ध भादंवि कलम 420 व 406 नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
नोकरीचे आमिष,तरूणाला हजारोंचा गंडा
