खेड / प्रतिनिधी:-तालुक्यातील बहिरवली मार्गावर रोलरखाली चिरडून स्वत: च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मृत चालक राहुल रंगराव पवार (रा. खोंडे) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते रोलर घेवून जात असताना अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे घाबरून जात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा जीव वाचवण्यासाठी रोलरचे स्टेरिंग सोडून रस्त्याबाहेर उडी मारली. यावेळी रोलर त्यांच्या अंगावरून गेल्याने जागा मृत्यू झाला होता. स्वत: च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.