खेड / प्रतिनिधी:-मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे येथील एक्सल फाट्यानजीक येथील पोलिसांनी 40 हजार रूपये किंमतीच्या गुटखा साठ्यासह 4 लाख रूपये किंमतीची इको कार जप्त करत फरहान फारूख मोहम्मद पटेल यास येथील पोलिसांनी अटक केली. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तो आपल्या ताब्यातील इको कारमधून (एम.एाा. 46/ एक्स 9857) गुटखा घेवून चिपळूण येथून खेडच्या दिशेने येत होता. याबाबती गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पवार, पोलीस शिपाई कृष्णा बांगर यांच्या पथकाने रंगहाथ पकडले होते. हा गुटखा त्यांनी नेमका कुठून आणला, या पोलीस शोध घेत आहेत.
खेड येथील गुटखा वाहतूकप्रकरणी संशयित पोलीस कोठडीत
