संगलट,खेड/इक्बाल जमादार:-ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य मोरवंडे-बोरज व रत्नागिरी जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख येथे बॉक्सिंग स्पर्धा संपन्न झाली.
ज्ञानदीप महाविद्यालय व रत्नागिरी जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने देवरुख येथे दि. ०९ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२३ रोजी मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन ४ (२०२३-२४) बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचा उदघाटन सोहळा रत्नागिरी जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. युयुत्स आर्ते, सेक्रेटरी वैभव वनकर तसेच आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. राम कदम, प्रा. समीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये कोकण झोन ४ मधील सर्व महाविद्यालयांचे खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये
ज्ञानदीप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण, दोन रौप्य तर एका कांस्य
पदकाची कमाई केली. यामध्ये प्रथम वर्ष वाणिज्य शाखेमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. वैष्णवी कदम व कु.
यशश्री भोसले यांनी सुवर्ण पदक, प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत असेलली कु. ऋतुजा शिंदे हिने रौप्य पदक,
द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेमध्ये शिकत असलेला विद्यार्थी अब्दुल कवचाली याने रौप्य तर तृतीय वर्ष वाणिज्य
शाखेमध्ये शिकत असलेला विद्यार्थी अम्मार आंबेडकर याने कांस्य पदकाची कमाई केली. या सर्व विद्यार्थ्यांची
रुईया कॉलेज, मुंबई येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली तसेच ज्ञानदीप
महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. मंगेश सकपाळ यांची कोकण झोन ४ बॉक्सिंग संघ प्रशिक्षक म्हणून
विद्यापीठामार्फत निवड झाली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रशिक्षक प्रा. मंगेश सकपाळ, प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. मंगेश सकपाळ, प्रा. किशोर मंडले तसेच श्री. उमेश दळवी यांनी या स्पर्धेचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले. यामध्ये त्यांना स्वयंसेवक मुसाब झगडे व मुआद उतरकर यांनी सहकार्य केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढढा, संस्थेचे सर्व सभासद व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांचेकडून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
ज्ञानदीप महाविद्यालय आयोजित मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण झोन ४ बॉक्सिंग स्पर्धा देवरुख येथे उत्साहात सपंन्न
