रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयात एड्स आणि HIV या असाध्य रोगाच्या निर्मूलनासाठी गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या डॉ. रश्मी अनिरुद्ध आठल्ये यांचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरीच्या वतीने अध्यक्षा डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम जागतिक एड्स निर्मूलन दिनादिवशी झालं. दरवर्षी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. गेली अनेक वर्षे हा दिवस साजरा केला जात असल्याने एड्स या रोगाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. यासाठी डॉ. रश्मी आठल्ये यांनी केलेले काम मोठे आहे. आत्ता यां रोगाबाबत मोठी जनजागृती झाली असली तरीही काही वर्षांपूर्वी या रोगाबद्दल भीती आणि अनेक गैरसमज होते. अशावेळी काम करणे मोठे आव्हानात्मक होते. तेव्हापासून डॉ. आठल्ये काम करत असून त्यांचे मोठे योगदान आहे असे डॉ. तोरल शिंदे यावेळी म्हणाल्या.
यावेळी डॉ. प्रज्ञा पोतदार, डॉ. अतुल ढगे, अन्य आयएमए सदस्य, रत्नागिरीतील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.