लांजा:-नावेरी नदीवर पेडणेकर वाडी, गांगोवाडी, पाटिलवाडी, बौद्धवाडी, हांदेवाडी खडकवाडी आणि रिंगणे कोंड येथे बंधारे
प्रतीवर्षी पेक्षा यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे लक्षात घेऊन व नदीतील पातळी एक ते दोन महिने आधीच कमी होत असल्याचे लक्षात घेऊन ग्रामनिधीतून जेसीबी आणि ग्रामस्थाच्या अंगमेहनतीतून काम पूर्ण करण्यात आले.पेडणेकर वाडी, गांगोवाडी, पाटिलवाडी, बौद्धवाडी, हांदेवाडी खडकवाडी आणि रिंगणे कोंड या ठिकाणी हे बंधारे बांधण्यात आले. नदीपात्राच्या शेजारी असलेल्या सार्वजनिक विहिरीची पाणी पातळी टिकून राहावी तसेच गावातील जाणवरांना पिण्यास, तसेच उन्हाळी शेतीला आणि इतर कामांना पाणी मिळावे हा महत्वकांशी उद्देश आहे.
या सातही बांधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या पूर्ण झाले असून रिंगणे गावचे कौतुक संपूर्ण तालुक्यात होत आहे. रिंगणे ग्रामपंचायतीचे सरपंच संजय आयरे,उपसरपंच पांडुरंग पेडणेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यात सहभागी झाले होते