देवरूख:-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस १२ डिसेंबरला संगमेश्वर तालुका राष्ट्रवादी, देवरूख शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे साजरा करण्यात येणार आहे.
राज्य सरचिटणीस सुरेश उर्फ बारक्याशेठ बने यांच्या पुढाकाराने देवरूख परिसरातील सगळ्या शाळेतील ३ हजार मुलांना खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता शाळांना भेटी देण्यास प्रारंभ होणार आहे. या वेळी डॉ. नलिनी भुवड, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, दत्ताराम लिंगायत, मोहन वनकर, बाबा सावंत, नीलेश भुवड आदी उपस्थित राहणार आहेत.