विधवा प्रथा बंद माझे मत लेखन स्पर्धेतील विजेत्यांचा मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृति मंचतर्फे गौरव सोहळा संपन्न
चिपळूण/ओंकार रेळेकर:-विधवा महिलांना समाजात मान – सन्मान द्या विधवा प्रथा हा एक अत्याचार आहे त्याला विरोध करायला शिका असे आवाहन रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले. मातोश्री लक्ष्मीबाई स्मृती मंच थेरशेत यांच्यावतीने रविवारी १० डिसेंबर रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे विधवा प्रताप बंद या विषयावर काम केलेल्या आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी आणलेल्या रूढी परंपरा यांना काट देणाऱ्या आणि विधवा स्त्रियांना समाजात सर्व नागरिकांसारखा मान आहे असे ठासून सांगणाऱ्या ग्रामपंचायतीचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले उपस्थित होत्या त्यांनी यावेळी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
विधवा प्रथा बंद हा विषय समाज जागृतीसाठी पुढे आला पाहिजे. असा विचार प्रत्येक घरात रूजला पाहिजे. इतकेच नाही तर प्रत्येक महिलेनी व स्वत: मध्ये विश्वास ठेवायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून पुढे जाण्याची गरज आहे. हे सर्व करत
असताना आपण समाजातील गरीब आणि वंचित लोकांना गरजेच्या वेळेस मदत करा असे आवाहनही डॉ. फुले
यांनी केले. कोणीही स्वत:ला अबला समजू नका.विधवा प्रथा हा एक अत्याचार आहे. त्याला विरोध करायला शिका. ज्या ग्रामपंचायतीनी या प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले
आहेत. त्यांचे डॉ. फुले यांनी या वेळी
आभार मानले.विधवा होणं, स्त्रीच्या अंगावरील दागिने उतरवणं आदी गोष्टिना स्वत: स्त्रीने विरोध केला आणि आपल्या मुलांसाठी ती जर ठामपणे समाजासमोर उभी राहिली तर तिच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही.आजची पिढी या अश्या सर्व प्रकारांना विरोध करताना दिसत आहे. शिक्षित समाजात या गोष्टिंना थारा नाही. त्यामुळे शिक्षणाचा प्रभाव अश्या रूढी आणि परंपरा यांना संपवण्यासाठी नक्कीच केला गेला पाहिजे.
असे मत या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ पत्रकार श्रीमती धनश्री पालांडे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील खेरशेत येथाल मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृति मंच या कौटुंबिक सेवाभावी संस्थेच्यावतीने ज्या ग्रामपंचायतीमार्फत अनिष्ट विधवा प्रथा बंदच्या आदेशाची अंमलबजावणी करून विधवा महिलांच्या सन्मानाकरिता सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक उपक्रम राबविले आहेत अशा ग्रामपंचायतीसह विधवा महिला बचत गट, महिला मंडळे, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ पुरस्कार संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजय कदम यांनी मान्यवरांच्या हस्ते सर्वांचा गौरव केला आहे. या वेळी अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली .आधुनिक क्रांतीपर्वातील स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान-२०२३ सन्मानार्थ पुरस्कार प्राप्त झालेल्यात रत्नागिरी- नाणीजचे सरपंच गौरव संसारे, पानवल सरपंच तनिष्का होरंबे, भडकंबा सरपंच बापू शिंदे, संगमेश्वर-मुरादपूरचे सरपंच मंगेश बांडागळे, गुहागर-उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, गुहागर- आबलोली सरपंच वैष्णवी नेटके, वरोली सरंपच नारायण चिपळूण-भिले सरपंच अदिती गुडेकर, पाचाड सरपंच नरेश घोले, दापोली- तेरेवायंगणी सरपंच मनोहर करबेले, नारडुवे सरपंच कृष्णा के जोगले यांचा समावेश आहे. सन्मानित सामाजिक संस्था नाचणे (रत्नागिरी) , पन्हळे (राजापूर) पल्लवी प्रतिष्ठान संस्थापक उमेश शिगवण, जुवाठी (राजापूर), अक्षरमित्र संस्थापक बी. के. गोंडाळ, सन्मानित महिला बचत गट-पाचाड (चिपळूण) आनंदी महिला बचत गट अध्यक्षा गायत्री सुर्वे व सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक कोकणचे गाडगेबाबा साखरपा (संगमेश्वर) येथील प्रबोधनकार मारुती काका जोयशी यांना शाल, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
याशिवाय विधवा प्रथा बंद माझे मत लेखन स्पर्धा सुद्धा या सस्थेने घेतली होती. राज्यातील दहा विजेत्यांना युग नायिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले लेखणी पुरस्कार देवून त्यांचा गौरव करण्यात आला. संतोष कुळे यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकि्सक डॉ संघमित्रा फुले, डॉ.गावडे, पत्रकार धनश्री पालांडे, चंद्रकांत सावंत, दत्ताराम मोहिते, संस्था अध्यक्ष संजय कदम, संघराज कदम, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.