रत्नागिरी:-कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून, 15 डिसेंबर रोजी मार्गावर अडिच तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे दोन गाड्या विलंबाने धावणार आहेत. देखभालीच्या कामास्तव हा मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.
कोकण रेल्वेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, 15 डिसेंबर रोजी सकाळी सात ते साडे नऊ या काळात सावर्डे ते रत्नागिरी या मार्गावर देखाभालीचे काम नियोजित आहे. त्यामुळे मार्गावर अडीच तास मेगाब्लॉ़क असेल असे रेल्वे विभागाने म्हटलंय.
यामुळे दोन ट्रेन विलंबाने धावणार आहेत.
ट्रेन क्रमांक 12617 एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस मडगाव ते रत्नागिरी दरम्यान नियंत्रित केली जाईल.
ट्रेन क्रमांक 20923 तिरुनेवेली गांधीधाम एक्सप्रेस देखील विलंबाने धावणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी अशी सूचना कोकण रेल्वेच्या वतीने करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर 15 डिसेंबरला अडीच तासांचा मेगाब्लॉक
