खेड:- शहरातील पूरग्रस्त व्यापारी व नागरीकांना सहा महिने होवून सुध्दा शासनाकडून मदत जाहिर झाली नाही या पार्श्वभूमीवर खेड काँग्रेसच्या वतीने १२ डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण तहसिलदार कार्यालय येथे करण्यात येणार आहे .
याबाबत चे निवेदन येथील प्रशासनाला सादर करण्यात आले यावेळी निवेदन देताना माजी नगरसेवक बशिरभाई मुजावर, खाडीपट्टा विभागाचे अध्यक्ष अजिमभाई सुर्वे,जिल्हा उपाध्यक्ष डाॅ.विलास शेळके, शहर उपाध्यक्ष मंगेशजी भागवत,पर्यावरण जिल्हाध्यक्ष किरण तायडे युवकचे तालुका अध्यक्ष स्वराज गांधी आणि श्री.अनिल सदरे आदी उपस्थित होते.
खेडमध्ये उद्या काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण
