प्राथमिक गट विद्यार्थी प्रतिकृती व माध्यमिक गट शिक्षक प्रतिकृतीची जिल्हास्तरासाठी निवड
सावर्डे- जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमानाने मोरेश्वर आत्माराम आगावेकर माध्यमिक विद्यालय अलोरे येथे 51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनामध्ये सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त कल आहे.प्राथमिक गट(6 वी ते 8 वी ) विद्यार्थी प्रतिकृतीमध्ये “रोड बॅरिगेट्स अँड एअर पॉवर कन्वर्टर टू इलेक्ट्रिसिटी” ची मांडणी केली होती यामध्ये आयुष पवार व ओम तांबे यांनी अतिशय उत्कृष्ट विवेचन केले.
या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विज्ञान शिक्षक गणेश बागवे व मंगेश दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.माध्यमिक गट(9 वी ते 12वी)शिक्षक प्रतिकृतीमधून” एक्सप्लोरिंग ग्राफ्स”ची मांडणी गणित शिक्षिका संचिता कदम यांनी केली होती याही प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या दोन प्रतिकृतींची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.प्रयोगशाळा परिचर प्रतिकृती मध्ये “पेरिस्कोप” ची मांडणी अतिश खेराडे यांनी केली होती या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. माध्यमिक गट(९ वी ते 12वी) विद्यार्थी प्रतिकृती मध्ये ॲडव्हान्स इरिगेशन सिस्टीम”ची मांडणी आदिनाथ वारे व आदित्य कुंभार यांनी केली.
सहाय्यक शिक्षक चिराग विचारे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे. विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षकांना या प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला.चिपळूणचे गट शिक्षणाधिकारी श्री.दादासाहेब इरणाक,मा.श्री.राजेंद्रकुमार राजमाने उपविभागीय पोलीस अधिकारी, मा.श्री.प्रवीण लोकरे तहसीलदार चिपळूण,विस्तार अधिकारी श्री.राज अहमद देसाई,या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देऊन यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांना गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सचिव महेश महाडिक,शालेय समितीचे चेअरमनव जेष्ठ विश्वस्त शांताराम खानविलकर,संस्थेचे पदाधिकारी, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर,शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करताना उपस्थित मान्यवर