सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे मध्ये सालाबाद प्रमाणे संस्थेच्या क्रीडा संकुलात शालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या गटात मुले 100 मीटर धावणे श्रेयस जोईल, आदित्य महिमकार व राजादन राठोड,200 मीटर धावणे सार्थक काणसे,प्रवज कांबळे, आदिन महीमकर या खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावून यश प्राप्त केले.मुले 4 बाय 100 मीटर रिले मध्ये सातवी क च्या संघाने प्रथम क्रमांक व सातवी अ च्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
मुली 100 मीटर धावणे श्रेया मार्कड,मुक्ता भुवड,व वंशिका शिगण,मुली 200 मीटर धावणे श्रेया मार्कड,मुक्ता भुवड व कस्तुरी घाग या खेळाडूंनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुली 4× 100 मीटर रिले मध्ये सातवी क च्या संघाने प्रथम क्रमांक, सातवी अ च्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. मुले गोळा फेक तन्मय वाघे, आयुष चव्हाण, यश जाधव, गोळा फेक मुली श्रेया मार्कड, समृध्दी टाकळे, तनया काणसे, थाळी फेक मुली श्रेया मार्कड, मुक्ता भुवड, स्वरा गावणंग या स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.सांघिक क्रीडा स्पर्धा कब्बडी मुले सातवी क विजेता, सातवी अ उपविजेता, मुली सातवी क, विजेता पाचवी ड उपविजेता झाला.मैदानी व सांघिक क्रीडा स्पर्धेत सर्व खेळाडूंनी अतिशय शिसतबद्धपणे उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.स्पर्धेचे नियोजन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्भव तोडकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख रोहित गमरे, अमृत कडगावे व प्रशांत सकपाळ यांनी केले.