कणकवली:- जानवली नदी येथील गणपती साना ते जानवली नदीवर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या माध्यमातून आज कच्चा बंधारा बांधण्यात आला. गेली १५ ते १६ वर्ष राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा बंदरा बांधण्यात येतो.
काल हा कच्चा बंधारा बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी नाईक यांनी बोलताना सांगितले की, यंदाचा पाऊस हा कमी प्रमाणात पडला आहे. आणि पाणी पातळी कमी होण्याची शक्यता असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी हा बंधारा लवकर व्हावा अशी मागणी आपल्याकडे केली. त्यामुळे काही दिवस आधी हा बंधारा घालण्यात आला असल्याचे सांगितले. हा बंधारा झाल्यामुळे जाणा येण्यासाठी लोकांचे ३ किलोमीटरचे अंतर वाचते. त्यामुळे नागरिकांनी देखील बंधारा झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. तसेच बंधारा झाल्यामुळे कणकवली शहर व आजूबाजूच्या विहिरींची पातळी वाढणार असल्याने कणकवली शहर वासियांनी देखील अबीद नाईक यांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रांतिक सदस्य विलास गावकर, शहराध्यक्ष इमरान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर सरचिटणीस गणेश चौगुले, तालुका सरचिटणीस उदय सावंत, संतोष कोकाटे ,डब्लू बागवान उपस्थित होते.
अबिद नाईक यांनी जपली जानवली नदीवरील बंधारा घालण्याची परंपरा
