नवी मुंबई:-हज २०२४ यात्रेसाठी ऑनलाइन अर्ज सोमवार(दि. ४)पासून हज कमिटी ऑफ इंडिया, मुंबईच्या संकेतस्थळ आणि मोबाइल अॅप्लिकेशनवर सुरू झाले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक इच्छुक अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे आणि घोषणा फॉर्म वाचणे आवश्यक आहे, असे वेबसाइटवर सांगण्यात आले आहे.
अर्ज सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी पूर्ण दिवस तर दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत तांत्रिक अडचणी येत होत्या. हज कमिटी ऑफ इंडियाच्या http://hajcommittee.gov.in या संकेतस्थळावर किंवा प्लेयस्टोरवरील हज सुविधा मोबाइल अॅपवर अर्ज करता येणार आहे.
नाशिक शहरात हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लीम बांधवांमधील जुने नाशिक भागाचा मोठा वाटा असतो. त्यासाठी या ठिकाणी जिल्हाभरातील हज यात्रेकरूंसाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हज यात्रा संबंधित सर्व प्रक्रियेत खादिमुल हुज्जाज ग्रुपतर्फे ऑनलाइन अर्जापासून ते यात्रेला जाईपर्यंतच्या सर्व सेवा अनेक वर्षांपासून विनामूल्य केल्या जात आहे. यावर्षी मोहम्मद अली रोडवर हज यात्रेकरूंसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी आयशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक शकील शेख यांनी आपले चालू कार्यालय अर्ज प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट, पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र, बँक पासबुक किंवा रद्द केलेले चेक, आधारकार्ड, पॅनकार्ड, रक्तगटाचे माहिती, कोविड वॅक्सीन प्रमाणपत्र.
हज यात्रेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू, २० डिसेंबर पर्यंत मुदत
