स्पर्धेत सिद्धी चाळके व प्रिया खरात प्रथम
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीचा उपक्रम
चिपळूण/प्रतिनिधी:विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटात सिद्धी संतोष चाळके तर माध्यमिक गटात रिया संजय खरात यांनी प्रथम क्रमांक संपादन केला .
चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती स्थानिक चिपळूण व मुंबई आणि शिक्षण समिती द्वारा चिपळूनातील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे महापरिनिर्वाणदिनी तालुकास्तरीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्व स्पर्धा – २०२३ “आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत सावंत हे होते. स्पर्धेचे संयोजन शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार यांनी केले.
माध्यमिक गटात ( इयत्ता आठवी ते दहावी ) प्रथम क्रमांक – रिया संजय खरात (धोंडीरामशेठ दाभोळकर इंग्लिश मीडियम स्कूल खेर्डी चिंचघरी ( सती ), द्वितीय क्रमांक – कावेरी राकेश चव्हाण (आर सी काळे माध्यमिक विद्यालय, पेढे परशुराम), तृतीय क्रमांक- गौरी संग्राम चव्हाण ( परांजपे मोतीवाले हायस्कूल, चिपळूण), उत्तेजनार्थ- पूर्वा मनोज महाडिक (श्री रामवरदायिनी विद्यालय, निरबाडे चिपळूण ) यांनी पटकावला. तर महाविद्यालयीन गटात (अकरावी ते पदवी- पदवीतर ) प्रथम क्रमांक- सिद्धी संतोष चाळके (डीबीजे महाविद्यालय, चिपळूण), द्वितीय क्रमांक – पार्थ दिनेश महाडिक (श्री रामवरदायिनी जुनिअर कॉलेज निरबाडे) आणि तृतीय क्रमांक- श्रेयस संतोष मानकर (न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी (सती) यांनी मिळवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री एस. डी. गायकवाड व श्री एन. व्ही. गमरे, विलास सकपाळ यांनी काम पाहिले.
पारितोषिके पुढीलप्रमाणे देऊन गौरवण्यात आले. माध्यमिक गटासाठी प्रथम क्रमांकाकरिता रोख रक्कम सातशे रुपये, द्वितीय क्रमांक रोख रक्कम सहाशे रुपये, तृतीय क्रमांक रोख रक्कम पाचशे रुपये, उत्तेजनार्थ रोख रक्कम तीनशे रूपये आणि सन्मानचिन्ह व सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तर महाविद्यालयीन गटासाठी प्रथम क्रमांकाकरिता रोख रक्कम 1000 रु , द्वितीय क्रमांकाकरिता रोख रक्कम 800 रु, तृतीय क्रमांकाकरिता रोख रक्कम 600 रु व सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले . तसेच सर्व सहभागी स्पर्धांनाही सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी तिसगाव विभागाचे सहचिटणीस व संस्थेचे तरुण कार्यकर्ते रोहित चंद्रशेखर गमरे यांची वेहेळे गावच्या सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभाला संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, चिटणीस सुहास पवार, खजिनदार जगदीश कांबळे, हिशोब तपासणीस दिवाकर जाधव, शिक्षण समितीचे अध्यक्ष संदेश पवार , संस्थेचे माजी सरचिटणीस रमाकांत सकपाळ, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष दिलीप मोहिते, धम्म कमिटीचे अध्यक्ष अनंत पवार, उपाध्यक्ष संजय मोहिते, चिपळूण विभागाचे अध्यक्ष विलास सकपाळ, स्पर्धेचे परीक्षक एन व्ही गमरे, एस डी गायकवाड, तसेच कार्यकर्ते संजय कदम, तुकाराम मोहिते , नरेश मोहिते , निरबाडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ बेंडाळे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी माजी सरचिटणीस रमाकांत सकपाळ, माजी गटविकास अधिकारी व राजहंस पतसंस्थेचे संचालक अरुण जाधव तसेच सुनील गमरे , दिलीप मोहिते, विलास सकपाळ , मंगेश जाधव (मुंबई) यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदेश पवार यांनी मानले. या स्पर्धेसाठी बहुसंख्या विद्यार्थी, शिक्षक पालक आणि नागरिक उपस्थित होते.