रत्नागिरी प्रतिनिधी:-तुमचे बँक खाते ब्लॉक झाले असून केवायसी करून घ्या अशी बतावणी करून एकाला सुमारे 38 हजार रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े. ही घटना 1 डिसेंबर 2023 रोजी घडल़ी. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना 1 डिसेंबर 2023 रोजी अज्ञात इसमाने कॉल करून तुमचे स्टेट बँकेचे खाते ब्लॉक झाले असून केवायसी अपडेट साठी खालील लिंक ओपन करून माहिती अपलोड करा असे सांगण्यात आल़े. तक्रारदार यांनी लिंक ओपन केली असता त्यांच्या खात्यामधील सुमारे 38 हजार 444 रूपये कमी झाल्याचे आढळून आल़े. दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल़ी.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरूद्ध भादंवि कलम 420 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क) नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.
बँक खातं ब्लॉक झालंय,केवायसी करून घ्या, सांगत हजारोंचा गंडा
