मंडणगड/प्रतिनिधी:-तालुक्यातील दंडनगरी येथे बुधवारी घराला लागलेल्या आगीत धान्य, पैसे, दागिने, कपडे जळून खाक झाल्याची घटना घडली. यामध्ये मोठे नुकसान झाले. आगीचे वृत्त कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घराचे लाकडी छप्पर व माळ्यावर ठेवलेले सर्व साहित्य जळून गेले. सुदैवाने घरातील कुटुंब कामानिमित्त मुंबईत असल्याने मोठा अनर्थ टळला.
दंडनगरी येथील परेश धोंडू शेळके व कुटुंब कामानिमित्त मुंबईत असल्याने हे घर बंद होते. घरातून अचानक आगीचे लोळ बाहेर येवू लागले. काही वेळातच घराच्या लाकडी छप्पराने पेट घेत पूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. स्थानिक तसेच कोंडगाव मोहल्ल्यातील ग्रामस्थ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घराचे छप्पर व माळ्यावर ठेवलेले धान्य, कपडे, दागदागिने व पैसे जळून गेले होते. घराच्या भिंती फक्त शिल्लक राहिल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याची स्पष्टता झाली नाही.
मंडणगडात घराला आग,कपडे,धान्य,दागिने,पैसे जळून खाक
