पालकमंत्री म्हणून मी चिपळूणवासियां समवेत:- उदय सामंत
चिपळूण/ओंकार रेळेकर:-चिपळूण नगर परिषदने वाढीव घरपट्टी बाबत नागरिकांना लेखी नोटीसा पाठवल्या होत्या त्यामुळे चिपळूण शहरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येत नगरपरिषद विरोधात मोर्चे आणि आंदोलन काढण्यात येणार होते. त्याबाबत पालकमंत्री उदय सामंत आज रत्नागिरीत येताच चिपळूण नगर परिषदच्या मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे व सर्व प्रशासना बरोबर मिटिंग घेऊन त्या बाबत माहिती घेत तात्काळ घरपट्टी वाढीचा निर्णय थांबवण्याचा आदेश दिला असून लोकांना वेठीस न धरता चांगले काम करण्याच्या सूचना दिल्या.
चिपळूण नगर परिषदच्या वाढीव घरपट्टी बाबत पाठवण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवा. पालकमंत्री म्हणून मी स्वतः चिपळूणला येऊन चिपळूणच्या जनतेशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.पालकमंत्री म्हणून मी चिपळूण वासियांना सोबत असून चिपळूणच्या जनतेने कोणतेही उपोषण किंवा आंदोलन करण्याची गरज नसल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. वाढीव घरपट्टी बाबत पालकमंत्री म्हणून स्थगिती देण्यात आले आहेत. त्यामुळे चिपळूण वासियांनी शांतता पाळण्याचे आहवान पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.