रत्नागिरी:-कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
गेल्याच आठवड्यात कोकण विकास समितीने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि संबंधित सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेऊन खासदार विनायक राऊत यांनी या रास्त व न्याय्य मागणीला पाठिंबा देऊन लवकरात लवकर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे, अशी मागणी मंत्री वैष्णव यांच्याकडे आज पत्राद्वारे केली आहे.
कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची खासदार विनायक राऊत यांची मागणी
