खेड:-मुंबई-गोवा महामार्गालगत वास्तव्यास असलेल्या एका गावात बापाने पोटच्या 17 वर्षीय लेकीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नराधम बापाला न्यायालयाने 8 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
14 सप्टेंबर ते 2 डिसेंबर याकालावधीत नराधम बापाने स्वत:च्या मुलीवर अत्याचार केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पिडित मुलीच्या आईने पोलीस स्थानक गाठत पतीविरोधात लैंगिक अत्याराची तक्रार दाखल केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तातडीने गुन्हा नोंद केला. मात्र घटनेनंतर नराधम बाप पसार झाला होता. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने तालुक्यात एका खळबळ उडाली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन भोयर, तसेच 4 पथके जंगलमय भागात रवाना करत कसून शोध घेत अवघ्या 24 तासात नराधम बापाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.