खेड / प्रतिनिधी:-खेड शहरातील शिवतररोड येथील विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मनाली मंगेश खेडेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. 4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजल्याच्या सुमारास तिने राहत्या घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. भरणे येथे एका खासगी रूग्णालयात तिला दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यानी मृत घोषित केले. याबाबत पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. विवाहितेच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.