रत्नागिरी:- मराठी पत्रकार परिषद रत्नागिरी यांच्यातर्फे मंगळवार दि. ५ डिसेंबर रोजी पत्रकार कक्ष, जयस्तंभ येथे पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आयुष्यमान भव कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पत्रकार व त्यांचे कुटुंबिय अशा एकूण ५७ जणांनी आयुष्यमान भव कार्ड शिबिराचा लाभ घेतला. मराठी पत्रकार परिषदेने या शिबिराचा लाभ घेण्यासंदर्भात आवाहन केले होते त्याला चांगला प्रतिसाद लाभला. जयस्तंभ येथील पत्रकार कक्षात आयोजित या शिबिराला सकाळ पासूनच लाभार्थ्यांनी गर्दी केली होती. ५ लाखापर्यंतच्या आरोग्य सुविधांचा लाभ कार्डधारकांना मिळणार आहे.
आरोग्य मित्र प्रसाद खानविलकर मानसी झापडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला आनंद तापेकर, राजेश शेळके, प्रशांत पवार, भालचंद्र नाचणकर, सतीश पालकर, सचिन बोरकर, रफिक मुकादम, निलेश जगताप, शकील गवाणकर, शोभना कांबळे, मैहरून नाकाडे, विजय बासुतकर, केतन पिलणकर, उन्मेश रोडे, राकेश गुढेकर व संपर्क युनिक फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.