रत्नागिरी:-मेरी झॉँसी नहीं दूंगी असे सांगता ब्रिटिशांशी झुंजार लढा देणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे केळ्ये शाळा क्र.१ येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच शाळेला अडीच हजार रुपयांची पुस्तके, अडीच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा व चरित्र पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन झाल्यानंतर शिक्षिका सौ. मनीषा गवाणकर यांनी रचलेल्या राणी लक्ष्मीबाईंवरील गौरवपर गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. यावेळी व्यासपीठावर सरपंच सौरभि पाचकुडवे, उपसरपंच काशिनाथ बापट, शाळा समिती सदस्य गजानन नाखरेकर, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, सदस्य प्रतिभा प्रभुदेसाई, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, प्रीती टिकेकर, प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना कदम, शिक्षिका पुष्पलता सावंत, पूर्वा डोर्लेकर, मनीषा गवाणकर, नितांजली शिंगे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पुष्प देऊन गौरवण्यात आले. सरपंच सौरभी पाचकुडवे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे आभार मानले. राणी लक्ष्मीबाईंचे गुण आजच्या विद्यार्थिनींनी घ्यावेत, असे आवाहन उपसरपंच बापट यांनी केले.
यावेळी अवनी केळकर हिने झाशीच्या राणीच्या वेशभूषेत राणीचे चरित्र थोडक्यात सांगितले. त्यानंतर झाशीच्या राणीवरील स्किट विद्यार्थ्यांनी सादर केले. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी सांगितले की, संघाला ९५ वर्षे झाली असून गेल्या पाच-सहा वर्षांपासून राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीनिमित्त शाळेत स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम केला जातो. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या रंगावल्या, विविध प्रकारच्या स्पर्धांमुळे कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला आहे.
स्पर्धांमधील विजेत्यांची नावे अशी – निबंध स्पर्धा– श्रावणी पवार, दुर्वा पाटील, तीर्था किर्वे, श्रावणी केळकर, सारा धावडे, विराज पवार.
वक्तृत्व स्पर्धा- विहान डांगे, अवनी केळकर, शुभ्रा कदम, गार्गी केळकर, सैफ पठाण, लावण्या मोरे.
चित्रकला स्पर्धा- विहान धुळप, अंश सोलकर, परी शिवलकर, दुर्वा पाटील, खदीजा पावसकर, तीर्था चव्हाण, वेदांत माने, समीर घवाळी, ओम गोवळकर.
रांगोळी स्पर्धा- सिया पाटील, उर्मी कांबळे, जय लिंगायत, श्रावणी केळकर, अस्मि धुळप, आविष्कार पावसकर.
धावणे- कौस्तुभ सनगरे, सार्थक ठीक, वेदांत मोहिते, श्रावणी पवार, पूर्वा पवार, शुभ्रा पवार, समीर घवाळी, रुद्र पावसकर, वेदांत माने, अस्मि पाटील, श्रेया कोतवडेकर, आकांक्षा आलीम.
फनी गेम्स- कैवल्य धुळप, स्मित माने, सौरभ सनगरे, पूनम आलीम, परी शिवलकर, खदीजा मुल्ला, प्रेम मोहिते, पूनम आलीम, सौरभ सनगरे, पूनम आलीम, विहान धुळप.