चिपळूण:-मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच या कौटुंबिक सेवाभावी संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या विधवा प्रथा बंदीच्या ठरावानुसार अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायती, महिला बचत गट, महिला मंडळ, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी जाहीर केला आहे.कृतिशील कार्यवाहीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी गेली २८ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, पर्यावरण व एड्स या क्षेत्रात कार्यरत असलेली मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच ही कौटुंबिक सेवाभावी संस्था कार्यरत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने आणि राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने संस्थेने अनिष्ट विधवा प्रथा बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करून विधवा महिलांच्या सन्मानाकरिता सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक उपक्रम राबविले आहेत, अशा ग्रामपंचायती तसेच विधवा महिला बचत गट, महिला मंडळे, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना स्त्रीमुक्ती स्वातंत्र्याचे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयडॉल ऑफ रत्नागिरी सन्मान २०२३ देण्याचे ठरविले.
विधवा महिलांना विविध सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक कार्यक्रमांत मानसन्मान मिळावा, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी किंवा प्रत्यक्ष कृतीतून नवा आदर्श निर्माण व्हावा, या अनुषंगाने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. जाहीर झालेले पुरस्कार असे – ग्रामपंचायत नाणीज (रत्नागिरी) सरपंच- गौरव संसारे, ग्रामपंचायत मुरादपूर (संगमेश्वर) सरपंच मंगेश बांडागळे, ग्रामपंचायत उमराठ (गुहागर) सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामपंचायत आबलोली (गुहागर) सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके, भिले (चिपळूण) सरपंच सौ. आदिती गुडेकर, तेरेवायंगणी (दापोली) सरपंच मनोहर करबेले, पानवल (रत्नागिरी) सरपंच तनिष्का होरंबे, भडकंबा (संगमेश्वर) सरपंच बापू शिंदे, वरवेली (गुहागर) सरपंच नारायण आंग्रे, पाचाड (चिपळूण) सरपंच नरेश धोरणे, नारडुवे (संगमेश्वर) सरपंच कृष्णा के जोगले.
सामाजिक संस्था – कुणबी समाजसेवा संघ, नाचणे (रत्नागिरी) सरचिटणीस विकास पेजे, पल्लवी प्रतिष्ठान, पन्हळे (राजापूर) संस्थापक उमेश शिगवण, अक्षरमित्र जुवाठी (राजापूर) संस्थापक बी. के. गोंडाळ.
महिला बचत गट – आनंदी महिला बचत गट पाचाड (चिपळूण) अध्यक्षा. समाजसेवक –
कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारुती काका जोयशी, साखरपा (संगमेश्वर).
पुरस्कार प्रदान सोहळा येत्या रविवारी, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता चिपळूण येथील प्रांत कार्यालयाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांच्या वतीने संघराज कदम (९५११२७३३५५) यांनी दिली आहे.
चिपळूण येथील मातोश्री लक्ष्मीबाई कदम संस्थेचे स्त्रीमुक्ती पुरस्कार जाहीर
