चिपळूण/ओंकार रेळेकर:-गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शिवाजीनगर येथे उद्योजक प्रकाशशेठ देशमुख यांनी सुरू केलेल्या हॉटेल अथितीचे रुपडे पालटले आहे. अतिथी एक्झिक्यूटिव्हमध्ये चिपळूणच्या कला वैभवात भर टाकणाऱ्या अथिती ग्रँड सिनेमागृहाचे नुकतेच शुभारंभ झाले असून या सिनेमागृहाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. पहिल्याच ‘ॲनिमल’ चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी पहावयास मिळाली.
चिपळूणमधील उद्योजक प्रकाशशेठ देशमुख यांनी प्रकाश इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या व्यवसायाबरोबरच काही वर्षांपूर्वी हॉटेल व्यवसायात पदार्पण केले चिपळूण शिवाजीनगर येथे हॉटेल अथिती सुरू केले. या हॉटेलमधील व्हेज नॉनव्हेज जेवणाला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाली. मात्र, या हॉटेलचे रुपडे पालटण्याचा प्रकाशशेठ देशमुख यांनी निर्णय घेतला.
यानुसार काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हॉटेल अथिती एक्झिक्यूटिव्ह ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. यामध्ये वातानुकुलीत लग्न समारंभ सभागृह, मिनी हॉल रुनस आणि सूटस, व्हेज अँड नॉनव्हेज ब्रेकफास्ट, फॅमिली रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तसेच चिपळूणच्या कलावैभवात भर टाकणाऱ्या अथिती ग्रँड सिनेमागृहाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिशय सुसज्ज अत्याधुनिक सोयींनीयुक्त असे अथिती सिनेमागृह उभारण्यात आले आहे. या मिनी थिएटरमध्ये ६५ आरामदायी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण थिएटर वातानुकूलित आहे. थिएटरची साऊंड सिस्टिम उत्कृष्ट असल्याने प्रेक्षकांना नवनवे चित्रपट पाहता येणार आहेत. अथिती ग्रँड सिनेमागृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी बुकिंग ऑनलाइन ‘बुक माय’ शो ला करू शकता किंवा थेट तिकीट मिळेल. आता सोमवार पर्यंत ‘ॲनिमल’ चित्रपट सुरू असून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तरी उर्वरित प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन हॉटेल अथिती एक्झिक्युटीचे मालक व उद्योजक प्रकाशशेठ देशमुख यांनी केले आहे.