रत्नागिरी:-अधिवक्ता दिवसाच्या निमित्ताने अधिवक्ता परिषद, (कोकण प्रांत) तालुका आणि जिल्हा रत्नागिरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि विविध न्यायालयांमध्ये ४० वर्षांहून अधिक वर्षे वकिली केलेल्या ज्येष्ठ विधीज्ञांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायाधीश दिलीप जामखेडकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती अधिवक्ता प्रफुल्ल कुलकर्णी यांची होती. प्रास्ताविक अधिवक्ता मनोहर जैन यांनी केले. यावेळी १३ अधिवक्त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर अधिवक्ता ए. एस. कदम, अधिवक्ता श्रीमती व्ही. ए. पाथरे, अधिवक्ता ए. व्ही. आगाशे, अधिवक्ता जी. एन. गवाणकर यांनी त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीतील विविध अनुभव आणि किस्से सांगितले.
माजी न्यायाधीश श्री. जामखेडकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, समाजाला चांगल्या वकिलांप्रमाणेच कुशल न्यायाधीशांची गरज आहे. तरुण वकिलांनी न्यायाधीश पदाकरिता जी परीक्षा घेतली जाते, त्याकरिता आवर्जून प्रयत्न करावेत.
अधिवक्ता परिषदेतर्फे रत्नागिरीत ज्येष्ठ विधीज्ञांचा हृद्य सत्कार
