दापोली येथील घटना
दापोली:-कर्तव्यावर असलेल्या पोलिसाशी हुज्जत घातल्याप्रकरणी 4 जणांना न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली आहे. अनिल अण्णाप्पा लक्ष्मण माने, शिवाजी शहाजी लक्ष्मण माने, रमेश पप्पू दत्तू नलावडे, चेतन भीमसेन नलावडे (सर्व राहणार नवानगर ता. दापोली ) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. ही घटना 2022 रोजी घडली.
दापोली येथे पोलीस शिपाई कर्तव्य बजावत असताना अनिल माने, शिवाजी माने, रमेश नलावडे, चेतन नलावडे यांनी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीनी न्यायालयांसमोर गुन्हा कबूल केल्याने त्यांना (प्ली बारगनींग) CRPC–कलम – 265(E) प्रमाणे दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये एकूण रक्कम 12000/-रुपये ही पिडीत याला नुकसान भरपाई म्हणून देणची शिक्षा सुनावली.
याबाबतचा तपास अंमलदार मपो.उपनि श्रीमती-शीतल पाटील, प्रभारी अधिकारी श्री.विवेक अहिरे पोलीस निरीक्षक दापोली यांनी केला. सरकारी अभियोगता
श्रीमती. एम.एम.जाडकर खेड सत्र न्यायालय यांनी पीडिताची बाजू मंडली. पैरवी अधिकारी म्हणून एस.बी.गायकवाड यांनी काम पाहिले.
पोलिसाशी हुज्जत घातल्याप्रकरणी चौघाना शिक्षा
