चिपळूण:-वाहन खरेदीतून 10 लाख 60 हजाराची फसवूणक केल्याची घटना 1 ते 30 मे 2023 या कालावधीत तालुक्यातील कामथे येथे घडली आहे. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या एकावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासीर टाके असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर याबाबतची फिर्याद एका महिलेने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ते 30 मे 2023 या कालावधीत तालुक्यातील कामथे येथे त्या महिलेने त्यांची चारचाकी नासीर टाके याला 10 लाख 60 हजार रुक्कमेला विकली होती. असे असताना ही रक्कम ठरल्याप्रमाणे वाहन खरेदी करताना काढण्यात आलेल्या वाहन कर्ज खात्यात जमा न करता त्या महिलेची टाके याने फसवणूक केली. तसेच ही गाडी त्या महिलेला परत न करता त्याचा विश्वासघात करुन चारचाकी वाहनाचा अपहार केला. याप्रकरणी टाके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळुणात वाहन खरेदीतून साडेदहा लाखाची फसवणूक
