खेड / प्रतिनिधी:-शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर येथून 40 हजार रूपये किमतीच्या दुचाकी चोरीप्रकरणी येथील पोलिसांनी रविवारी रात्री एकास अटक केली. तर एकजण फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दोघेही चोरटे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.
2 डिसेंबर रोजी अनिकेत शॉपिंग सेंटर च्या बाजूला रूपेश चव्हाण यांनी दुचाकी उभी करून ठेवली होती. सायंकाळच्या सुमारास दुचाकी चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीस गेलेली दुचाकी चकाळे येथे आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. तर फरारी झालेल्याचा कसून शोध सुरू आहे.