सिंधुदुर्ग:- नौदल दिनानिमित्त आज सिंधुदुर्ग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तारकर्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोणत्याही देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचं आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज ओळखून होते. त्यामुळे त्यांनी शक्तिशाली नौसेना बनवली. त्यांचे सगळे मावळे आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. भारताने आज गुलामीची मानसिकता मागे टाकली आहे, ती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. नौसेनेच्या ध्वजाला मागच्या वर्षी महाराजांच्या विचारांशी जोडता आलं, हे माझं भाग्य आहे. आता नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावं देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली.
नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
