संगलट,खेड/इक्बाल जमादार:-दापोली शहरातील दापोली नगरपंचायतीच्या आवारातील पवनचक्कीचा टॉवर नगरपंचायत आवारातील एका कारवर मोठा आवाज करत कोसळला.
त्या ठिकाणी उभी असलेली चार चाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. सदर पवनचक्कीचा टोवर कोसळताना मोठा आवाज होऊन कोसळला.त्यामुळे त्या परिसरामध्ये असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी त्या ठिकाणाहून धावपळ केली. हा टॉवर हा गेल्या अनेक वर्षापासून पडण्याच्या अवस्थेत होते.मात्र संबंधित खात्याकडून दुर्लक्ष करण्यात आले असल्याची चर्चा सुरू आहे.